रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

पुरंदर


नाव       : पुरंदर किल्ला (Purandar fort)

उंची      : ४४७२ फूट  

दर्जा      : सोपा

ठिकाण : नारायणपूर  (पुणे)

वेळ      : १ ता ३० मि (पायथ्यापासून )







कसे पोहोचायचे :

 

 पुणे मार्गे:
               किल्ल्याच्या  पायथ्याशी असलेले गाव नारायणपूर पर्यंत पोहोचण्यासाठी पुणे ते नारायणपूर एसटी बस उपलब्ध आहे. पुणे एसटी डेपो मधून सासवडच्या दिशेने(जेजुरी ,पंढरपूर , इंदापूर इ. ) जाणारी बस पकडुन सासवडला उतरावे.

 सासवड  मार्गे:
                    सासवड - भोर  एसटी बस पकडुन नारायणपूर गावाच्या पुढे असणार्‍या ’पुरंदर घाटमाथा’ या थांब्यावर उतरावे. सासवड ते नारायणपूर ही अशी एसटी बस सेवा सुद्धा उपलब्ध आहे. 

तसेच सासवड / नारायणपूर गावातून किल्ल्याच्या प्रवेश द्व्यारापर्यंत खाजगी वाहने पण भाड्याने करता येतात.  

सूचना: 

  • खाजगी वाहने भाड्याने करताना पैसे , वेळ आणि पहाण्याची ठिकाणे  ठरवुन घ्यावे.  
  • पुरंदर  किल्ला भारतीय लष्कराच्या हद्दीत असल्यामुळे कमीत  कमी ग्रुप मधील एकाकडे ओळख पत्र (पॅन कार्ड, आधार कार्ड, गाडी चालवायचा परवाना इ. ) असावे .
  • किल्ला पाहण्याची वेळ  सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. 
  • डाच्या पायथ्याशी कॅमेरा आणि कॅमेरा असलेले मोबाईल भारतीय लष्कराकडे जमा करावे लागतात. 
  • किल्ला भारतीय लष्कराच्या हद्दीत असल्यामुळे ’पुरंदर घाटमाथा’ या बस थांब्यावरुन गडावर जाण्याची वाट सुरु आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी.
  • सासवड / नारायणपूर गावातून किल्ल्याच्या प्रवेश द्वारापर्यंत खाजगी वाहनाने प्रवास करणे योग्य ठरेल.

अनुभव आणि  छायाचित्र :

 

 रात्रीची १०. ५५ मि शिर्डी फास्ट पासेंजर ट्रेन पकडून आम्ही १८ जणांनी आमच्या प्रवासाला सुरवात केली.
शिर्डी फास्ट पासेंजर

रात्रभर ट्रेन मध्ये अंताक्षरी खेळत आम्ही सकाळी ४ वा. १५ मि.पुणे स्टेशन वर पोचलो पुणे स्टेशन वर चहा नाष्टा करून सकाळी ६ वा. सासवडला जाणारी बस पकडुन अंदाजे १ तासात  सासवडला उतारलो.
नाष्टा
 पुणे -इंदापूर बस
सासवड बस स्थानक
सेल्फी

सासवडमधुन खाजगी वाहन करून आम्ही पुरंदर  किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.
भाड्याने केलेले खाजगी वाहन


























सकाळी ८ वा ३० मि किल्ल्याच्या प्रवेश द्वाराजवळ पोचल्यामुळे, अर्धा तास किल्ल्याच्या प्रवेश द्व्यारासमोर फोटो काढत टाईम पास करत सकाळी ९ वा किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली.






गडाच्या पायथ्याशी कॅमेरा आणि कॅमेरा असलेले मोबाईल भारतीय लष्कराकडे जमा केल्यामुळे गडावर फोटो न काढण्याची खंत यावेळी जाणवत होती.










वीर मुरार बाजी देशपांडे





                        
       दुपारी २ वा गाडीत बसुन परतीच्या प्रवासाला सुरवात केली. दत्त मंदीरात दत्ताचे दर्शन घेऊन आम्ही ३ वा सासवडला पोचलो.
दत्त मंदिर

















                                       सासवड -स्वारगेट -पुणे असा प्रवास करत पुण्याहून ६ वा ट्रेन पकडली.  

1 टिप्पणी: