
उंची : ~5400 फूट
दर्जा : मध्यम
ठिकाण : बारी, नगर
वेळ : 3 ते ४ तास
कसे पोहोचायचे :
मुंबई(कसारा) मार्गे:
मुंबई(CST) ते कसारा जाण्यासाठी सकाळी पहिली लोकल ट्रेन सकाळी ४ वा. १२ मि. आणि शेवटची ट्रेन रात्री 12 वा. 15 मि. आहे. कसारा वरून इगतपुरीला जाण्यासाठी एक्स्प्रेस ट्रेन असतात. तसेच खाजगी टॅक्सीनेही इगतपुरी पर्यंत जाता येते. कसारा स्थानका बाहेरील खाजगी जीपने देखील आपण बारी या गावी पोहचू शकतो.
मुंबई(इगतपुरी) मार्गे:
मुंबई ते इगतपुरी जाण्यासाठी मुंबई (CST) / लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) पासुन एक्स्प्रेस ट्रेन असतात.
पुणे मार्गे:
पुणे रेल्वे स्टेशन वरुन मुंबई ट्रेन पकडून कल्याण स्टेशन वर उतरावे. कल्याण स्टेशन वरुन लोकल /एक्सप्रेस ट्रेन पकडून कसारा/इगतपुरी स्टेशन वर उतरावे.
किंवा
पुणे/शिवजी नगर एस टी डेपो मधुन नाशिक बस पकडवी. नाशिक मधुन इगतपुरी / कसारा /मुंबई ला जाणारी बस/खाजगी टॅक्सी पकडून इगतपुरी ला उतरावे.
भंडारदराला जाणाऱ्या ST बस ने बारी या गावी पोहचावे.तसेच खाजगी जीपने देखील आपण बारी या गावी पोहचू शकतो. बारी गावातून मळलेली वाट आहे. शिखरावर जाण्यासाठी ३ ते ४ लोखंडी शिड्या लागतात. साधारण 3 तासाच्या चालीनंतर आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर पोहचतो.
यूट्यूब व्हिडिओ लिंक :
उनाड क्षण - कळसुबाई
सूचना:
- गावात जेवणाची आणि राहण्याची सोय होते.
- काळानुसार एक्स्प्रेस, लोकल किंवा बस गाड्यांचे वेळापत्रक बदलते, त्यामुळे ट्रेकची योजना करताना स्वत: संशोधन करावे.
- कळसुबाई ट्रेक ची योजना करताना सकाळी 5 किंवा 6 वाजता चढायला सुरवात होईल अशी करावी जेणेकरून चढाताना उन्हाचा त्रास होणार नाही.
- बारी ते कसारा / इगतपुरी साठी जास्त एस.टी बस उपलब्ध नाही त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी कसारा / इगतपुरी वरूनच खाजगी वाहन ठरवून घ्यावे किंवा ट्रेकची योजना एस.टी बस आणि ट्रेनच्या वेळेनुसार करावी.
आमचा खर्च:- एकूण खर्च : रु. 500/ व्यक्ती
अनुभव आण छायाचित्र :
रात्री ३ वा. कसारा स्टेशन वर उतरून कळसुबाई शिखराकडे निघालो.
सकाळी ६ वाजेपर्यंत गावातील ऐका घरात आराम करून शिखर चढायला सुरवात केली
३ ते ४ ता. लोखंडी शिड्या , टेकड्या चढून शिखरावर पोहोचलो.