मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

मल्हारगड

नाव      : मल्हारगड (Malhargad /
              Sonori Fort)

दर्जा      : सोपें
        
ठिकाण : सोनोरी ( सासवड ,पुणे )

वेळ      :  ३० मि.







कसे पोहोचायचे :


पुणे मार्गे
:

      पुणे एसटी डेपो मधून सासवडच्या दिशेने(जेजुरी ,पंढरपूर , इंदापूर इ. ) जाणारी बस पकडुन काळेवाडी किंवा सासवड ला उतरावे. काळेवाडी / सासवड ते सोनोरी गावापर्यंत टम-टम करून गडाच्या पायथ्याशी पोहचावे.

सूचना:

  • सासवड ते काळेवाडी हे अंतर ७ किमी आणि काळेवाडी ते सोनोरी गाव (गडाच्या पायथ्याशी) हे अंतर ४-५ किमी आहे.
  •  सासवड ते काळेवाडी पर्यंत जाण्यासाठी टम -टम १०० रु. आणि सासवड ते सोनोरी गावापर्यंत जाण्यासाठी २५० रु. घेतात. 
  •  काळेवाडी ते सोनोरी गावापर्यंतचा रस्ता खडतर आहे. 

अनुभव आणि  छायाचित्र :


पुणे बस डेपो 
                        पहाटेच्या थंडीत चहा नाष्टा करून, पुणे बस डेपोतुन सासवडला जाण्यासाठी बस पकडली. 


मल्हारगड 
         गड चढायला छोटा असल्यामुळे काळेवाडी गावात उतरून गडापर्यंत चालत जाण्याचे ठरवले. 

















                                    १ ते २ तास चालत गेल्यावर शेवटी गडाच्या पायथ्याशी पोहचलो. 

गडाच्या पायथ्याशी

                        गड चढायला मोठा नसल्यामुळे ३० ते ३५ मि. सगळे न थकता गडावर पोहचले. 













महादेव आणि खंडोबा मंदिर 












                      गडावर भटकंती करून झाल्यावर खाऊन , १ आराम करून गडाला निरोप दिला.  




छायाचित्रण साभार (Photo Credits) :  


योगेश
सुनील आणि तुषार