इगतपुरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इगतपुरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

कळसुबाई शिखर

नाव      :  कळसुबाई (Kalsubai)

उंची      : ~5400 फूट

दर्जा      : मध्यम

ठिकाण : बारी, नगर

वेळ      : 3 ते ४ तास


कसे पोहोचायचे :

मुंबई(कसारा) मार्गे: 

                 मुंबई(CST)  ते  कसारा जाण्यासाठी सकाळी पहिली लोकल ट्रेन सकाळी  ४ वा. १२ मि. आणि शेवटची ट्रेन रात्री 12 वा. 15 मि. आहे.  कसारा वरून इगतपुरीला जाण्यासाठी एक्स्प्रेस ट्रेन असतात. तसेच खाजगी टॅक्सीनेही  इगतपुरी पर्यंत जाता येते.  कसारा स्थानका बाहेरील खाजगी जीपने देखील आपण बारी या गावी पोहचू शकतो.

मुंबई(इगतपुरी) मार्गे:  

                मुंबई ते इगतपुरी जाण्यासाठी मुंबई (CST) / लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) पासुन एक्स्प्रेस ट्रेन असतात.

पुणे मार्गे:
                  पुणे रेल्वे स्टेशन वरुन मुंबई ट्रेन पकडून कल्याण स्टेशन वर उतरावे. कल्याण स्टेशन वरुन लोकल /एक्सप्रेस ट्रेन पकडून कसारा/इगतपुरी स्टेशन वर उतरावे.         
                                         
                                                                          किंवा

पुणे/शिवजी नगर एस टी डेपो मधुन नाशिक बस पकडवी. नाशिक मधुन इगतपुरी / कसारा /मुंबई ला  जाणारी बस/खाजगी टॅक्सी पकडून इगतपुरी ला उतरावे.


भंडारदराला जाणाऱ्या ST बस ने बारी या गावी पोहचावे.तसेच खाजगी जीपने देखील आपण बारी या गावी पोहचू शकतो. बारी गावातून मळलेली वाट आहे. शिखरावर जाण्यासाठी ३ ते ४ लोखंडी शिड्या लागतात. साधारण 3 तासाच्या चालीनंतर आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर पोहचतो.

यूट्यूब व्हिडिओ लिंक :

उनाड क्षण - कळसुबाई

सूचना: 

  • गावात जेवणाची आणि राहण्याची सोय होते.
  • काळानुसार एक्स्प्रेस, लोकल किंवा बस गाड्यांचे वेळापत्रक बदलते, त्यामुळे ट्रेकची योजना करताना स्वत: संशोधन करावे.
  • कळसुबाई ट्रेक ची योजना करताना सकाळी 5 किंवा 6 वाजता चढायला सुरवात होईल अशी करावी जेणेकरून चढाताना उन्हाचा त्रास होणार नाही.
  • बारी ते कसारा / इगतपुरी साठी जास्त एस.टी बस उपलब्ध नाही त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी कसारा / इगतपुरी वरूनच खाजगी वाहन ठरवून घ्यावे किंवा ट्रेकची योजना एस.टी बस आणि ट्रेनच्या वेळेनुसार करावी.

आमचा  खर्च:

  • एकूण खर्च : रु. 500/ व्यक्ती

अनुभव आण  छायाचित्र :

                                  रात्री ३ वा. कसारा  स्टेशन वर उतरून कळसुबाई  शिखराकडे निघालो. 


                 सकाळी ६ वाजेपर्यंत गावातील ऐका  घरात आराम  करून  शिखर  चढायला  सुरवात  केली 











३ ते ४ ता. लोखंडी शिड्या , टेकड्या  चढून शिखरावर  पोहोचलो. 











रविवार, १७ जानेवारी, २०१६

हरीहर


नाव : हरीहर किल्ला (हर्षगड / Harihar Fort)

उंची      : 3676 फूट  

दर्जा      : मध्यम ते कठीण

ठिकाण : निरगुडपाडा ( इगतपुरी )

वेळ      :  २ तास

कसे पोहोचायचे :

 

कसारा किंवा नाशिक मार्गे: 

                         मुंबई(CST)  ते  कसारा जाण्यासाठी सकाळी पहिली लोकल ट्रेन सकाळी  ४ वा. १२ मि.आहे.  कसारा / नाशिक वरून इगतपुरीला जाण्यासाठी एक्स्प्रेस ट्रेन असतात. तसेच खाजगी टॅक्सीनेही  इगतपुरी पर्यंत जाता येते.  कसारा ते निरगुडपाडा  जाण्यासाठी खाजगी टॅक्सी अंदाजे रु.१५० / व्यक्ती घेतात. 

 

इगतपुरी मार्गे:

                       मुंबई ते इगतपुरी जाण्यासाठी मुंबई (CST) / लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) पासुन एक्स्प्रेस ट्रेन असतात. निरगुडपाडा गावापर्यंत जाण्यासाठी इगतपुरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी.  इगतपुरी एस.टी  डेपो वरून सकाळी ८ वा. ३० मि. आणि  दुपारी अंदाजे १ वा. बस आहे.
सकाळी ८ वा. 
बस चुकली तर खाजगी टॅक्सी निरगुडपाडा गावापर्यंत जाण्यासाठी अंदाजे रु.७० / व्यक्ती  घेतात. 

 

सूचना: 

  • वर दिलेले गाडीचे भाडे हे अंदाजे आहे .निरगुडपाड्यासाठी टॅक्सी भाडयाने करताना कमीत कमी ९-१० जणांचा ग्रुप असावा नाहीतर ग्रुपच्या संखेनुसार प्रती व्यक्ती भाडे कमी-जास्त होईल.  
  • काळानुसार एक्स्प्रेस, लोकल किंवा बस गाड्यांचे वेळापत्रक बदलते, त्यामुळे ट्रेकची योजना करताना स्वत: संशोधन करावे.
  • निरगुडपाडा ते कसारा / इगतपुरी साठी जास्त एस.टी बस उपलब्ध नाही त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी कसारा / इगतपुरी वरूनच खाजगी वाहन ठरवून घ्यावे किंवा ट्रेकची योजना एस.टी बस आणि ट्रेनच्या वेळेनुसार करावी.  
  • गडावर स्वच्छ पाण्याचा स्रोत नाही त्यामुळे गडावर जाताना भरपूर पाणी घेऊन जावे. 

 

अनुभव आणि  छायाचित्र :

कसारा रेल्वे स्टेशन
सकाळी कसारा रेल्वे स्टेशन पोचल्यावर इगतपुरीसाठी एक्स्प्रेस ट्रेन पकडली.
इगतपुरी रेल्वे स्टेशन
इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर चहा नाष्टा करून निरगुडपाड्यासाठी बस पकडण्यासाठी जवळच असलेल्या बस डेपो कडे प्रवास चालू केला. 
नाष्टा
इगतपुरी  बस स्थानक
इगतपुरी  बस स्थानक वेळापत्रक
सकाळी ८ वा. ३० मि. बस चुकल्यामुळे भाड्याने गाडी करून निरगुडपाडा गावापर्यंत पोचलो

 

सकाळी ११ वा. निरगुडपाडा गावात पोचल्यावर ट्रेकला सुरवात केली.

दुरून काढलेला गडाचा फोटो

 

 

गडावर जाताना
  

१ - १.३० तासात जंगलातुन चालत-चालत गडाच्या पायथ्याशी पोचलो 

गडाच्या पायथ्याशी असलेला झेंडा
 गडाच्या पायथ्यापासून अवघड ट्रेक ला सुरवात होते. 
पायथ्यापासून काढलेला गडाचा फोटो


गडावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या

३०-४० मि. गडाच्या पायऱ्या चढून शेवटी गडावर पोचलो. 





गडावर असलेला पाण्याचा साठा






   


गडावर पोचल्यावर हात-पाय धुवून नाष्टा करून थकवा दूर केला

गडावर भटकंती करून परतीच्या प्रवासाला सुरवात केली. 


खाली उतरून गावात पोचेपर्यंत त्या दिवसासाठी सुर्य देवाने आम्हाला निरोप दिला होता.