मंगळवार, २८ जून, २०१६

रायगड

नाव : रायगड किल्ला (Raigad Fort)

उंची      : 2700-2900 फूट  

दर्जा      : मध्यम

ठिकाण : पाचड ( रायगड / Raigad )

वेळ      :  २ तास

 

 

कसे पोहोचायचे :

                         मुंबई / पुणे ते  महाड जाण्यासाठी एस.टी (ST) बस आहेत. तसेच महाड ते रायगड (Raigad) किल्याच्या पायथ्याशी (पाचड गावापर्यंत) जाण्यासाठी एस.टी (ST) किंवा एस.टी (ST)  डेपो बाहेरून खाजगी वाहने मिळू शकतात. 


सूचना: 

  • डावर जाण्यासाठी रोपवेची(Ropeway) व्यवस्था असल्यामुळे १५ ते २० मि. गडावर पोहचता येते.
  • जास्त जणांचा ग्रुप असेल तर मुंबई/पुणे>महाड>पाचड हा प्रवास खाजगी गाडीने करणे योग्य ठरेल.  
  • डावर जाण्यासाठी अंदाजे १५०० पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात.  
  • रायगड (Raigad) किल्ल्यावर राहण्याची व खाण्याची  सोय आहे.     

अनुभव आणि  छायाचित्र :


शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मुहूर्त बघून आम्ही रायगडावर (Raigad ) जाण्याचे ठरवले आणि ठरल्याप्रमाणे रात्री प्रवासाला सुरवात केली.


रात्रभर प्रवास करून पहाटे रायगडाच्या पायथ्याची पोचलो. राज्याभिषेक असल्यामुळे गाडी थोडी लांब उभी करावी लागली.













 















           पाऊस आणि धुक्याच्या आनंद घेत पहाटेच्या ताज्या हवेत गड चढायला सुरवात केली.



                                             राज्याभिषेकासाठी गडावर मोठी गर्दी उसळली होती.
गडावर चढत असलेले शिवभक्त
                                      
                                         दोन-अडीच तासात घोषणा देत गडावर पोचलो
रायगड किल्याचा नकाशा

                            गडावर वेगवेगळे ढोल ताशा पथके आपली कलाकृती सादर करण्यासाठी आले होते. 

मल्हार ढोल ताशा पथक
शिवदर्शन ढोल ताशा पथक 
शिवमावळा ढोल ताशा पथक

                                              राज्याभिषेकासाठी असलेली गडावरची गर्दी बघून ,
                        असे वाटत होते जणू गडावर भगव्या आणि पांढऱ्या रंगाची चादर पसरलेली आहे.


पालखी



       ढोल ताश्यांच्या गजरात गडावर शिवाजी महाराज्यांचा जयजयकार करत सगळे बेधुंद होऊन नाचत होते. 



                             रात्री गाडीत गाण्यांच्या भेंड्या खेळून , गड चढून आणि नाचुन दमल्यामुळे 
                                               शेवटी आम्हाला पोटाची आठवण झाली.  

                                     पेटपूजा झाल्यावर आम्ही गडावर भटकंती करायला सुरवात केली 











गडावर काढलेली रांगोळी
गडावर काढलेली रांगोळी
दुपार नंतर ढोल ताश्या पथकांची आवराआवर चालू झाली. दुपारी ४ वा. गडावर भटकंती झाल्यावर आम्ही सुद्धा गड उतरायला लागलो.