शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

तोरणा

नाव : तोरणा किल्ला (प्रचंडगड / Torana Fort)

उंची      : ४६०६ फूट  

दर्जा      : मध्यम ते कठीण

ठिकाण : वेल्हे (पुणे)

वेळ      :  ३ तास




कसे पोहोचायचे :

                            वेल्हे गावापर्यंत पोहोचण्यासाठी स्वारगेट-वेल्हे बस उपलब्ध आहे. स्वारगेट पर्यंत पोहचण्यासाठी  पुणे / शिवाजीनगर - स्वारगेट बस / रिक्षा उपलब्ध असतात. 

 

सूचना: 

  • तोरणा(Torana)  किल्ला एका दिवसात पूर्ण करायचा असेल तर पुणे ते वेल्हे प्रवास खाजगी वाहनाने करावा.
  • खाजगी वाहने भाड्याने करताना पैसे, वेळ ठरवुन घ्यावे. खाजगी वाहने पुणे/शिवाजीनगर-वेल्हे-पुणे / शिवाजीनगर यासाठी अंदाजे ३००० रु. पर्यंत भाडे घेतात. 
  • ट्रेक पावसाळ्यात अतिशय अवघड होते म्हणून पावसाळ्यात ट्रेकिंग करताना अतिरिक्त काळजी घ्या.  
  • हिवाळ्यामध्ये(winter season) तोरणा(Torana)  गडावर ट्रेकिंगला जाण्याची योग्य वेळ आहे.  
  • डावर स्वच्छ पाण्याचा स्रोत नाही त्यामुळे गडावर जाताना भरपूर पाणी घेऊन जावे.  

अनुभव आणि  छायाचित्र :

                   
                  शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन शिवाजीचे स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा(Torana)  पडले होते. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून 'प्रचंडगड'(Prachandgad) असे ठेवले.

नकाशा
गडाची माहिती 
                             पहाटे शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळुन वेल्हे गावाकरता भाड्याने गाडी केली  
शिवाजीनगर रेल्वे स्टेशन 
सकाळी ६ वा. गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावात पोचल्यावर शेकोटी करून उजाडण्याची 
वाट बघत बसलो
शेकोटी  
हॉटेल तोरणा विहार 
मिसळ पाव 
पेटपुजा झाल्यावर गडावर जाण्यास सुरवात केली 








सकाळी गावावर सर्वत्र धुके पसरलेले होते.   




                                 फोटो काढत,रस्ता शोधत, थकत बसत एकदाचे गडावर पोचलो.

झुंझार माची 
झुंझार माचीवर लावलेला झेंडा 

झुंझार माचीकडे जाण्यासाठी असलेला भुयारी मार्ग 







झुंझार माची वरून काढलेले गडाचे छायाचित्र 
   मेंगाई मातेच्या मंदिरात १०ते १५  जणांची राहण्याची सोय होते . 



गडावर बांधकामासाठी दगड आणण्याचे काम चालू होते 





गडावर असलेले जुने बांधकाम 
गडावर असलेले जुने बांधकाम 





                  गडावर जाण्यासाठी आम्हाला अंदाजे ४ ते ५ तास आणि उतरण्यासाठी २ तास लागले.


रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

पुरंदर


नाव       : पुरंदर किल्ला (Purandar fort)

उंची      : ४४७२ फूट  

दर्जा      : सोपा

ठिकाण : नारायणपूर  (पुणे)

वेळ      : १ ता ३० मि (पायथ्यापासून )







कसे पोहोचायचे :

 

 पुणे मार्गे:
               किल्ल्याच्या  पायथ्याशी असलेले गाव नारायणपूर पर्यंत पोहोचण्यासाठी पुणे ते नारायणपूर एसटी बस उपलब्ध आहे. पुणे एसटी डेपो मधून सासवडच्या दिशेने(जेजुरी ,पंढरपूर , इंदापूर इ. ) जाणारी बस पकडुन सासवडला उतरावे.

 सासवड  मार्गे:
                    सासवड - भोर  एसटी बस पकडुन नारायणपूर गावाच्या पुढे असणार्‍या ’पुरंदर घाटमाथा’ या थांब्यावर उतरावे. सासवड ते नारायणपूर ही अशी एसटी बस सेवा सुद्धा उपलब्ध आहे. 

तसेच सासवड / नारायणपूर गावातून किल्ल्याच्या प्रवेश द्व्यारापर्यंत खाजगी वाहने पण भाड्याने करता येतात.  

सूचना: 

  • खाजगी वाहने भाड्याने करताना पैसे , वेळ आणि पहाण्याची ठिकाणे  ठरवुन घ्यावे.  
  • पुरंदर  किल्ला भारतीय लष्कराच्या हद्दीत असल्यामुळे कमीत  कमी ग्रुप मधील एकाकडे ओळख पत्र (पॅन कार्ड, आधार कार्ड, गाडी चालवायचा परवाना इ. ) असावे .
  • किल्ला पाहण्याची वेळ  सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. 
  • डाच्या पायथ्याशी कॅमेरा आणि कॅमेरा असलेले मोबाईल भारतीय लष्कराकडे जमा करावे लागतात. 
  • किल्ला भारतीय लष्कराच्या हद्दीत असल्यामुळे ’पुरंदर घाटमाथा’ या बस थांब्यावरुन गडावर जाण्याची वाट सुरु आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी.
  • सासवड / नारायणपूर गावातून किल्ल्याच्या प्रवेश द्वारापर्यंत खाजगी वाहनाने प्रवास करणे योग्य ठरेल.

अनुभव आणि  छायाचित्र :

 

 रात्रीची १०. ५५ मि शिर्डी फास्ट पासेंजर ट्रेन पकडून आम्ही १८ जणांनी आमच्या प्रवासाला सुरवात केली.
शिर्डी फास्ट पासेंजर

रात्रभर ट्रेन मध्ये अंताक्षरी खेळत आम्ही सकाळी ४ वा. १५ मि.पुणे स्टेशन वर पोचलो पुणे स्टेशन वर चहा नाष्टा करून सकाळी ६ वा. सासवडला जाणारी बस पकडुन अंदाजे १ तासात  सासवडला उतारलो.
नाष्टा
 पुणे -इंदापूर बस
सासवड बस स्थानक
सेल्फी

सासवडमधुन खाजगी वाहन करून आम्ही पुरंदर  किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.
भाड्याने केलेले खाजगी वाहन


























सकाळी ८ वा ३० मि किल्ल्याच्या प्रवेश द्वाराजवळ पोचल्यामुळे, अर्धा तास किल्ल्याच्या प्रवेश द्व्यारासमोर फोटो काढत टाईम पास करत सकाळी ९ वा किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली.






गडाच्या पायथ्याशी कॅमेरा आणि कॅमेरा असलेले मोबाईल भारतीय लष्कराकडे जमा केल्यामुळे गडावर फोटो न काढण्याची खंत यावेळी जाणवत होती.










वीर मुरार बाजी देशपांडे





                        
       दुपारी २ वा गाडीत बसुन परतीच्या प्रवासाला सुरवात केली. दत्त मंदीरात दत्ताचे दर्शन घेऊन आम्ही ३ वा सासवडला पोचलो.
दत्त मंदिर

















                                       सासवड -स्वारगेट -पुणे असा प्रवास करत पुण्याहून ६ वा ट्रेन पकडली.