सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

असावगड

नाव      : असावगड (Asavgad)

उंची      : २४०० फूट

दर्जा      : मध्यम
        
ठिकाण : वारंगडे( बोईसर )

वेळ      :  १.४५ ते  २ तास

 

कसे पोहोचायचे :


पश्चिम रेल्वे मार्गे
:

                पश्चिम रेल्वेवरून डहाणू लोकल पकडून बोईसर स्टेशनवर उतरावे. तसेच विरार स्टेशन वरून विरार-डहाणू लोकल ट्रेन आहेत. मुंबई सेंट्रल वरून सुटणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या सुद्धा बोईसर स्टेशनवर थांबतात.


मध्य रेल्वे मार्गे
:

              मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्टेशन वरून सकाळी ५ वा. ४३ मि. सुटणाऱ्या डोंबिवली-डहाणू लोकलने बोईसरला जाता येते.
                  

बोईसर स्टेशन वर उतरल्यावर पश्चिमेला बाहेर पडावे. असावगड (Asavgad) किल्याच्या जवळ असलेल्या वारंगडे गावात जाण्यासाठी टम-टम(Six Sitter) उपलब्ध असतात, तसेच जवळच असलेल्या एसटी डेपो मधून ठाणे किंवा कल्याणला जाणाऱ्या एसटी बसेस वारंगडे गावात थांबतात.

 

 वारंगडे बस थांब्यावर उतरून थोडे पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूस जाणारा छोटा डांबरी रस्ता किल्याच्या दिशेने जातो. डांबरी रस्त्याने १० ते १५ मि. चालत गेल्यावर डाव्या बाजूला अंगणवाडी लागते, अंगणवाडीच्या समोरूनच (रस्त्याच्या उजव्या बाजूस ) एक कच्चा रास्ता किल्ल्याकडे जातो. कच्या रस्त्याने ओहळ ओलांडून ५-६ मि. चालत गेल्यावर आडवा रास्ता लागतो. आडव्या रस्त्याला लागुनच एक नाला आहे, या नाल्यावर ३ पूल आहेत. पहिल्या आणि  तिसऱ्या पुलावरून किल्यावर जाता येते. पहिला पुल थोडा मोठा आणि दुसरा व तिसरा पुल पहिल्या पुलाच्या तुलनेत छोटे आहेत. 
 

पहिला पुल ओलांडून पुढे चालत गेल्यास जंगलातून जाणारा रस्ता लागतो. या रस्त्याने गडावर जाता  येते. हा रस्ता जंगलातून जात असल्याने वाट शोधत पुढे जावे लागते, त्यामुळे वाटाड्या असेल तरच या रस्त्याने जावे.

 

तिसरा पुल (पहिल्या पुल न ओलंडता उजवीकडे चालत जाऊन तिसरा पुल लागतो ) ओलांडून पुढे चालत गेल्यास समोरच्या छोट्या टेकडीवर जाणारी पायवाट लागते. त्या वाटेने चालत गेल्यावर डोंगराला वळसा घालून गडावर जाता येते.  

 

सूचना:
  • बोईसर ते वारंगडे गावापर्यंत जाण्यासाठी टम-टम आणि बस अंदाजे रु. १० / व्यक्ती घेतात.
  • काळानुसार गाड्यांचे भाडे / वेळापत्रक बदलते, त्यामुळे ट्रेकची योजना करताना स्वत: संशोधन करावे. 
  • डावर जाणारे रस्ते दाट झाडीतून असल्यामुळे किडे / डास चावतात. त्यामुळे किडे / डास चावू नये यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.   
  • वाटाड्या घेऊनच पहिल्या पुलाच्या रस्त्याने जावे, नाहीतर रस्ता चुकण्याची जास्त शकत्या आहे.

अनुभव आणि  छायाचित्र :


बोईसर रेल्वे स्टेशन
          सकाळी बोईसर स्टेशनवर उतरल्यावर वारगंडे गावाकडे जाण्यासाठी बोईसर - कल्याण बस पकडली.

बोईसर - कल्याण बस
वारागंडे

                       वारागंडे गावात उतरल्यावर गडावर (Asavgad) जाण्यासाठी आम्ही आमचा प्रवास सुरू केला. 

गडाकडे जाणारा डांबरी रस्ता


ओहळ ओलांडून लागणारा कच्चा रास्ता

















                        गडावर (Asavgad) जाण्यासाठी आम्ही पहिल्या पुलावरून जाणारा रस्ता निवडला.

पहिल्या पुलावरून जाणारा रस्ता
जंगलातून जाणारा रस्ता
ढगांतुन  पडणारा जोरदार पाऊस आणि दाट जंगल, त्यामुळे गडाकडे जाणारा रस्ता सापडत नव्हता. शेवटी आम्ही परत माघे फिरून तिसऱ्या पुलावरून जायचे ठरवले. 

तिसरा पूल

















डोंगराला वळसा घालून गडावर जाणारी पायवाट













                                              १.३० ते २ ता. चालत-चालत, फोटो काढत गडावर पोहचलो.






                     गडावर (Asavgad) असलेल्या पाण्याच्या साठ्याजवळ बसून जेवायला सुरवात केली. 


 बोईसर स्टेशन वरून जास्त अंतराने गाड्या असल्यामुळे , गडावर थोडी भटकंती करून ३ वा. परतीच्या प्रवासाला सुरवात केली.