शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

माणिकगड

नाव      : माणिकगड (Manikgad)

 उंची      : १८४७ फूट

दर्जा      : मध्यम
        
ठिकाण : वडगाव ( पनवेल )

वेळ      : २ ते ३ ता.



कसे पोहोचायचे :

 

मध्य रेल्वे मार्गे:

                      मध्य रेल्वे वरील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Mumbai CST) , कुर्ला (Kurla) किंवा ठाणे (Thane)  स्टेशन वरून  लोकल ट्रेन पकडून पनवेल ला पोहचावे. 

 

कर्जत (Karjat) स्टेशन वरून सुद्धा पनवेलला जाण्यासाठी मोजक्या ट्रेन उपलब्ध आहेत. 

 

पश्चिम रेल्वे मार्गे:

                          अंधेरी (Andheri) स्टेशन वरून पनवेलला जाण्यासाठी अंधेरी-पनवेल लोकल ट्रेन आहेत. 

 

पनवेल बस डेपो मधून पनवेल-वडगाव बस पकडून वडगाव गावात उतरावे. तसेच पनवेल वरून वडगाव ला जाण्यासाठी टम-टम (Six Sitter) / रिक्षा (Rickshaw) उपलब्ध असतात.

 

वडगाव गावात उतरून थोडं पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूला जावे. १० ते १५ मि. चालत गेल्यावर गावातील मंदिर लागते. मंदिराच्या बाजूने जाणारी वाट गडाच्या दिशेने जाते.  गडावर जाणारा रस्ता हा जंगलातुन जात असल्यामुळे रस्ता शोधत गडावर पोहचावे लागते. 

सूचना: 

  • नवेल रेल्वे स्टेशन पासून पनवेल बस डेपो पर्यंत जाण्यासाठी चालत १० ते १५ मि लागतात. 
  • डावर जाण्यासाठी पर्यायी आणि सोपे मार्ग उपलब्ध आहेत. 
  • नवेल ते वडगाव गावापर्यंत जाण्यासाठी टम-टम आणि बस अंदाजे रु. २०-३० / व्यक्ती घेतात.
  • वाटाड्या घेऊनच गडावर जावे, नाहीतर रस्ता चुकण्याची जास्त शकत्या आहे.

 

अनुभव आणि  छायाचित्र :


                      सकाळी कुर्ला स्टेशन वरून ६ वा ६ मि लोकल ट्रेन पकडून पनवेल स्टेशनला पोहचलो. 

.
६ वा ०६ मि पनवेल लोकल
पनवेल स्टेशन

      स्टेशन जवळ नाष्टा करून पनवेल डेपो मधुन वडगाव ला जाण्यासाठी पनवेल-वडगाव बस पकडली. 


बटाटा भजी

 

 

 

 

 

 

 
चहा

                                             १ ता.  प्रवास करून शेवटी वडगावात पोहचलो. 

 

 

 

                             गडावर जाणारा रस्ता माहीत नसल्यामुळे वाटाडया घेऊन जाण्याचे ठरवले. 

 





                                                  २ ते ३ ता. चालत जाऊन गडावर पोहोचलो. 

 





                                

                             गडावर फिरून, खाऊन झाल्यावर गड उतरायला सुरवात केली. 



छायाचित्रण साभार (Photo Credits) :

संदेश
तुषार