नाव : सोनगिर(Songir) /
पळसदरीचा किल्ला
पळसदरीचा किल्ला
उंची : २५०० फूट
दर्जा : मध्यम
ठिकाण : पळसधरी (कर्जत)
वेळ : २-३ तास
अनुभव आणि छायाचित्र :
पावसाळ्यात मी जेव्हा मुंबई-पुणे किंवा पुणे-मुंबई प्रवास करायचो तेव्हा कर्जत-लोणावळा मध्ये नेहमी हिरवागार डोंगर बघून तिकडे जायची इच्छा होत होती आणि शेवटी तो दिवस आला, मी आणि माझे जिवलग मित्र सोनगिर(Songir) गडावर गेलो. आम्ही अंदाजे सकाळी ६.३० च्या आसपास पळसधरी स्टेशन वर पोचलो.
![]() |
पळसधरी रेल्वे स्टेशन |
गमत म्हणजे ट्रेन मधून त्या स्टेशन वर उतरणारे फक्त आम्हीच होतो आणि नेहमी प्रमाणे कोणालाही गडावर जाण्याचा रस्ता माहीत नव्हता.
![]() |
कर्जत-लोणावळा रेल्वे पटरी |
![]() |
रेल्वे इंजिन |
थोडस चालल्यानंतर पुढे एक बोगदा दिसला, त्या बोगदयाच्या अगोदरच एक कॅबीन आहे. त्याच्या थोडस मागे डावीकडे एक छोटीशी पाऊलवाट सोनगिरी गडावर जाते.
![]() |
बोगदा |
गडावर
जाण्यासाठी दुसरा पण रस्ता आहे, तो नवली(Navli) या गावातुन जातो. पण आम्ही
जंगलातून जाणारा मार्ग निवडला. त्या जंगलातून हळू हळू रस्ता काढत पुढे
चालत होतो.
जून महिना असून पण पाऊस पडत नव्हता त्यामुळे पावसाची मजा काही अनुभवता आली नाही. गडावर जायला पूर्ण रस्ता हा जंगलातून आहे त्यामुळे कदाचित वन्य प्राणी सुद्धा दिसण्याची शक्यता आहे.
![]() |
क्षणभर विश्रांती |
थोड्यावेळाने नाष्टा करण्यासाठी एका जागी थांबलो आणि सगळ्यांनी आणलेला नाष्टा फस्त केला.
![]() |
मस्ती |
मध्ये थोडफार रस्ता अवघड आहे, मोठ-मोठे दगड चढून पार करावे लागतात. पण ते दगड पार करताना, जंगलातून चालतांना मजा वेगळीच येत होती.
दगड पार करताना |
![]() |
मी पण आलोच :) |
![]() |
वाचवा हा हा हा !!!! |
२-३ तासात मज्जा मस्ती करत आम्ही गडावर पोचलो
त्या उंचावरून जे निसर्गाचे सुंदर दर्शन आम्हाला घडत होते ते अप्रतिम होते. सगळीकडे हिरवा रंग जशी आपली हुकुमत गाजवत होता
![]() |
गडावरून काढलेला ट्रेन चा फोटो |
त्या डोंगरांतून आगीनगाडी आवाज देत आपला मार्ग काढत पुढे जात होती.
निसर्गाचा सुखद अनुभव घेतल्यावर आम्ही गडावर दुपारचे जेवण केले.जेवल्यानंतर गडावर थोडा वेळ घालवला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
![]() |
निसर्गाचा आनंद घेताना |
![]() |
परतीचा प्रवास सुरु |
पण उतरताना आम्ही मात्र वेगळा मार्ग निवडला कारण ज्या रस्त्याने आम्ही आलो तो थोडा निसरता होता. उतरताना कुठे माती तर कुठे तीव्र उतार आमच्या मार्गात अडथळे निर्माण करत होते.
![]() |
जंगलातून उतरताना |
पण शेवटी आम्ही कर्जत-लोणावळा रेल्वे मार्गावर पोचलो. उतरल्यावर आमच्या लक्ष्यात आले की जेथून आम्ही चढायला सुरवात केलेली त्यापेक्षा १५-२० मिनिटे लांब उतरलो.गडावर चढायला सकाळी लवकर सुरवात केल्यामुळे, आम्ही पळसधरी स्टेशन वर लवकर पोचलो. त्यामुळे आम्ही धरणावर जायचं ठरवल. त्या पाण्यामध्ये मस्त भिजलो खेळलो.
वडापाव |
नंतर पोटाने भूक लागली म्हणून आवाज दिल्यावर आम्ही धरणाजवळच्या एका छोटयाश्या हॉटेलमधे गेलो.
तिथे मस्त चहा बिस्कीट आणि वडापाव वर ताव मारल्यावर आम्हाला ट्रेन च्या वेळेची आठवण झाली.
पण स्टेशन च्या दिशेने जात असतानाच ट्रेन चा आवाज एकू आला आणि सगळे पळत स्टेशन वर पोचलो आणि ट्रेन पकडली.
मस्तच.... खूप छान प्रवास वर्णन केले
उत्तर द्याहटवा