नाव : हरीहर किल्ला (हर्षगड / Harihar Fort)
उंची : 3676 फूट
दर्जा : मध्यम ते कठीण
ठिकाण : निरगुडपाडा ( इगतपुरी )
वेळ : २ तास
कसे पोहोचायचे :
कसारा किंवा नाशिक मार्गे:
मुंबई(CST) ते कसारा जाण्यासाठी सकाळी पहिली लोकल ट्रेन सकाळी ४ वा. १२ मि.आहे. कसारा / नाशिक वरून इगतपुरीला जाण्यासाठी एक्स्प्रेस ट्रेन असतात. तसेच खाजगी टॅक्सीनेही इगतपुरी पर्यंत जाता येते. कसारा ते निरगुडपाडा जाण्यासाठी खाजगी टॅक्सी अंदाजे रु.१५० / व्यक्ती घेतात.
इगतपुरी मार्गे:
मुंबई ते इगतपुरी जाण्यासाठी मुंबई (CST) / लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) पासुन एक्स्प्रेस ट्रेन असतात. निरगुडपाडा गावापर्यंत जाण्यासाठी इगतपुरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. इगतपुरी एस.टी डेपो वरून सकाळी ८ वा. ३० मि. आणि दुपारी अंदाजे १ वा. बस आहे.
सकाळी ८ वा. बस चुकली तर खाजगी टॅक्सी निरगुडपाडा गावापर्यंत जाण्यासाठी अंदाजे रु.७० / व्यक्ती घेतात.
सूचना:
- वर दिलेले गाडीचे भाडे हे अंदाजे आहे .निरगुडपाड्यासाठी टॅक्सी भाडयाने करताना कमीत कमी ९-१० जणांचा ग्रुप असावा नाहीतर ग्रुपच्या संखेनुसार प्रती व्यक्ती भाडे कमी-जास्त होईल.
- काळानुसार एक्स्प्रेस, लोकल किंवा बस गाड्यांचे वेळापत्रक बदलते, त्यामुळे ट्रेकची योजना करताना स्वत: संशोधन करावे.
- निरगुडपाडा ते कसारा / इगतपुरी साठी जास्त एस.टी बस उपलब्ध नाही त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी कसारा / इगतपुरी वरूनच खाजगी वाहन ठरवून घ्यावे किंवा ट्रेकची योजना एस.टी बस आणि ट्रेनच्या वेळेनुसार करावी.
- गडावर स्वच्छ पाण्याचा स्रोत नाही त्यामुळे गडावर जाताना भरपूर पाणी घेऊन जावे.
अनुभव आणि छायाचित्र :
 |
कसारा रेल्वे स्टेशन |
सकाळी कसारा रेल्वे स्टेशन पोचल्यावर इगतपुरीसाठी एक्स्प्रेस ट्रेन पकडली.
 |
इगतपुरी रेल्वे स्टेशन |
इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर चहा नाष्टा करून निरगुडपाड्यासाठी बस पकडण्यासाठी जवळच असलेल्या बस डेपो कडे प्रवास चालू केला.
 |
नाष्टा |
 |
इगतपुरी बस स्थानक |
 |
इगतपुरी बस स्थानक वेळापत्रक |
सकाळी ८ वा. ३० मि. बस चुकल्यामुळे भाड्याने गाडी करून निरगुडपाडा गावापर्यंत पोचलो
सकाळी ११ वा. निरगुडपाडा गावात पोचल्यावर ट्रेकला सुरवात केली.
 |
दुरून काढलेला गडाचा फोटो |
 |
गडावर जाताना |
१ - १.३० तासात जंगलातुन चालत-चालत गडाच्या पायथ्याशी पोचलो
 |
गडाच्या पायथ्याशी असलेला झेंडा |
गडाच्या पायथ्यापासून अवघड ट्रेक ला सुरवात होते.
 |
पायथ्यापासून काढलेला गडाचा फोटो |
 |
गडावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या |
३०-४० मि. गडाच्या पायऱ्या चढून शेवटी गडावर पोचलो.
 |
गडावर असलेला पाण्याचा साठा |
गडावर पोचल्यावर हात-पाय धुवून नाष्टा करून थकवा दूर केला
गडावर भटकंती करून परतीच्या प्रवासाला सुरवात केली.
खाली उतरून गावात पोचेपर्यंत त्या दिवसासाठी सुर्य देवाने आम्हाला निरोप दिला होता.