नाव : तोरणा किल्ला (प्रचंडगड / Torana Fort)
उंची : ४६०६ फूट
दर्जा : मध्यम ते कठीण
ठिकाण : वेल्हे (पुणे)
वेळ : ३ तास
कसे पोहोचायचे :
वेल्हे गावापर्यंत पोहोचण्यासाठी स्वारगेट-वेल्हे बस उपलब्ध आहे. स्वारगेट पर्यंत पोहचण्यासाठी पुणे / शिवाजीनगर - स्वारगेट बस / रिक्षा उपलब्ध असतात.
सूचना:
- तोरणा(Torana) किल्ला एका दिवसात पूर्ण करायचा असेल तर पुणे ते वेल्हे प्रवास खाजगी वाहनाने करावा.
- खाजगी वाहने भाड्याने करताना पैसे, वेळ ठरवुन घ्यावे. खाजगी वाहने पुणे/शिवाजीनगर-वेल्हे-पुणे / शिवाजीनगर यासाठी अंदाजे ३००० रु. पर्यंत भाडे घेतात.
- ट्रेक पावसाळ्यात अतिशय अवघड होते म्हणून पावसाळ्यात ट्रेकिंग करताना अतिरिक्त काळजी घ्या.
- हिवाळ्यामध्ये(winter season) तोरणा(Torana) गडावर ट्रेकिंगला जाण्याची योग्य वेळ आहे.
- गडावर स्वच्छ पाण्याचा स्रोत नाही त्यामुळे गडावर जाताना भरपूर पाणी घेऊन जावे.
अनुभव आणि छायाचित्र :
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन
शिवाजीचे स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात
गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा(Torana) पडले होते. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव
बदलून 'प्रचंडगड'(Prachandgad) असे ठेवले.
 |
नकाशा |
 |
गडाची माहिती |
पहाटे शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळुन वेल्हे गावाकरता भाड्याने गाडी केली
 |
शिवाजीनगर रेल्वे स्टेशन |
सकाळी ६ वा. गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावात पोचल्यावर शेकोटी करून उजाडण्याची
वाट बघत बसलो
 |
शेकोटी |
 |
हॉटेल तोरणा विहार |
 |
मिसळ पाव |
पेटपुजा झाल्यावर गडावर जाण्यास सुरवात केली
सकाळी गावावर सर्वत्र धुके पसरलेले होते.
फोटो काढत,रस्ता शोधत, थकत बसत एकदाचे गडावर पोचलो.
 |
झुंझार माची |
 |
झुंझार माचीवर लावलेला झेंडा |
झुंझार माचीकडे जाण्यासाठी असलेला भुयारी मार्ग
 |
झुंझार माची वरून काढलेले गडाचे छायाचित्र |
मेंगाई मातेच्या मंदिरात १०ते १५ जणांची राहण्याची सोय होते .
 |
गडावर बांधकामासाठी दगड आणण्याचे काम चालू होते |
 |
गडावर असलेले जुने बांधकाम |
 |
गडावर असलेले जुने बांधकाम |
गडावर जाण्यासाठी आम्हाला अंदाजे ४ ते ५ तास आणि उतरण्यासाठी २ तास लागले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा