उंची : ३००० फूट
दर्जा : मध्यम
दर्जा : मध्यम
ठिकाण : तुंगवाडी (लोणावळा)
वेळ : १ ते २ ता.
कसे पोहोचायचे :
मुंबई मार्गे:
मध्य रेल्वे वरील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Mumbai CST) स्टेशन वरून एक्सप्रेस ट्रेन पकडून लोणावळ्याला पोहचावे. तसेच दादर स्टेशन जवळच असलेल्या एस.टी डेपोमधून मधून निघणाऱ्या मुंबई-पुणे बस लोणावळ्याला थांबतात.
पुणे मार्गे :
पुणे रेल्वे स्टेशन वरून लोकल / एक्सप्रेस ट्रेन पकडून लोणावळ्याला पोहचावे. पुण्यावरून १ ता. च्या अंतराने पुणे-लोणावळा लोकल ट्रेन असतात किंवा मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन / एस.टी बस सुद्धा लोणावळाला थांबतात.
लोणावळा एस.टी डेपोमधून बस उपलब्ध आहेत ,पण बस फक्त घुसळखांब गावापर्यंत जाते. घुसळखांब गावातुन २ ते २.३० ता. चालत जाऊन तुंगवाडीत जावे लागते.
सूचना:
लोणावळा रेल्वे स्टेशन पासून लोणावळा बस डेपो पर्यंत जाण्यासाठी चालत १० ते १५ मि लागतात.
घुसळखांब गावातुन तुंगवाडीत जाण्यासाठी खाजगी गाड्या सुद्धा हात दाखवून थांबतात.
आमचा खर्च:
- एकूण खर्च : रु. ४०० / व्यक्ती
अनुभव आणि छायाचित्र :
सकाळी मुंबई वरून इंद्रायणी एक्सप्रेस पकडून लोणावळा स्टेशनला पोहचलो.
![]() |
लोणावळा स्टेशन |
![]() |
लोणावळा - घुसळखांब बस |
२५ ते ३० मि. घुसळखांब ला पोहोचलो.
![]() |
घुसळखांब - तुंगवाडी रस्ता |
थोडं चालत , खाजगी गाडयांना थांबवून १ ते १.३० ता. घुसळखांब वरून तुंगवाडी ला पोहचलो.

![]() |
मंदिर |
लोणावळ्याला परत जाताना |