रविवार, ६ ऑगस्ट, २०१७

घनगड

नाव      : घनगड  (Ghangad)

उंची      : २५०० फूट

दर्जा      : मध्यम

ठिकाण : भांबर्डे (लोणावळा)

वेळ      : १ ते २ ता.



कसे पोहोचायचे :

 

मुंबई मार्गे:

                      मध्य रेल्वे वरील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Mumbai CST) स्टेशन वरून एक्सप्रेस ट्रेन पकडून लोणावळ्याला पोहचावे. तसेच दादर स्टेशन जवळच असलेल्या एस.टी  डेपोमधून मधून निघणाऱ्या मुंबई-पुणे बस लोणावळ्याला थांबतात. 


पुणे मार्गे :

             पुणे रेल्वे स्टेशन वरून लोकल / एक्सप्रेस ट्रेन पकडून लोणावळ्याला पोहचावे. पुण्यावरून १ ता. च्या अंतराने पुणे-लोणावळा लोकल ट्रेन असतात किंवा मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन / एस.टी बस  सुद्धा लोणावळाला थांबतात.  

 

लोणावळा एस.टी डेपोमधून अंदाजे  ४० कि.मी. अंतरावर असलेल्या भांबर्डे गावात जाणारी एस. टी पकडावी. भांबर्डे गावातून १५-20 मि. असलेल्या एकोले गावात चालत जावे.  एकोले गावातून गडावर जाण्याचा रस्ता आहे. गडाच्या वाटेवर एक मंदिर लागते , मंदिरासमोर दिपमाळ आहेत. दिपमाळीजवळ मंदिराच्या दिशेने तोंड करून उभे राहिल्यावर, डाव्या बाजूने जाणारी वाट गडावर जाते.  


सूचना: 

  • लोणावळा रेल्वे स्टेशन पासून लोणावळा बस डेपो पर्यंत जाण्यासाठी चालत १० ते १५ मि लागतात. 
  • लोणावळा एस.टी डेपोमधून सकाळी ९ वा. ०५ मि. लोणावळा-भांबर्डे एस. टी बस आहे. 

  • पावसाळ्यात घनगडावर (Ghangad) जाणारी वाट निसरडी होते. तसेच गडावर धुक्याचे प्रमाणही जास्त असते. 
  • भांबर्डे गावातून लोणावळ्याला जाणारी शेवटची एस. टी बस दुपारी २ वा. ३० मि. आहे. 
  • खाजगी गाडी लोणावळ्याला जाण्यासाठी अंदाजे रु. १५०० ते २००० घेतात.  

आमचा  खर्च:

  • एकूण खर्च : रु. ५०० / व्यक्ती 

अनुभव आणि  छायाचित्र :


                      सकाळी ९ वा.०५ मि. लोणावळा एस. टी डेपोवरून भांबर्डे गावात जाण्यासाठी बस पकडली.
           
लोणावळा-भांबर्डे एस. टी बस


भांबर्डे 
                                     भांबर्डे गावात चहा पिऊन गडाच्या दिशेने वाटचाल सुरु केली.





















   



                                         ३०-३५ मि. चालत गेल्यावर मंदिराजवळ पोहचलो.


दिपमाळेच्या डाव्या बाजूने जाणारी वाट गडावर जाते


                                                    १.३० ते २ ता. गाड्याच्या पायथ्याशी पोहचलो.








गडाच्या टोकावर जाण्यासाठी लोखंडी शिडीने चढून जावे लागते.































पाण्याचे टाके 



 गडावर पाऊस आणि धुक्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे जास्त वेळ न थांबता गड उतरायला सुरवात केली.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा