शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

नाणेघाट

    नाव      : नाणेघाट(NaneGhat)

     उंची      : २8०० फूट

     दर्जा      : मध्यम

     ठिकाण : वैशाखरे

     वेळ      : 2 ते 3 ता.



कसे पोहोचायचे :

 

मुंबई मार्गे:

             कल्याण रेल्वे स्टेशन वरून २ मि. अंतरावर असलेल्या एस.टी डेपो मधुन माळशेज मार्गे जाणाऱ्या एस.टी ने "नाणेघाट" या नामनिर्देशित फलकाच्या जवळ उतरावे. नाणेघाटाकडे जाणारा रस्ता वैशाखरे गावापासून २ ते ३ किमी आहे. तेथून २ ते २.३० ता. नाणेघाटावर पोहचता येते. 

   

पुणे मार्गे :

             पुणे (शिवाजीनगर) एस.टी डेपो मधुन जुन्नर बस पकडून जुन्नरला पोहचावे. जुन्नर वरून घाटघर एस.टी ने घाटघर ला पोहचावे. घाटघर वरून नाणेघाट ४ ते ५ किमी आहे.     


                                                                    किंवा 


               पुणे (शिवाजीनगर) एस.टी डेपो मधुन आळेफाटा / संगमनेर / नाशिक / शिर्डी (संगमनेर मार्गे) इत्यादी एस.टी पकडून आळेफाट्याला उतरावे. आळेफाट्यावरून कल्याणला जाणाऱ्या एस.टी ने "नाणेघाट" या नामनिर्देशित फलकाच्या जवळ उतरावे. तेथून २ ते २.३० ता. नाणेघाटावर पोहचता येते. 

सूचना: 

  • नाणेघाट नामनिर्देशित फलकाच्या जवळून कल्याण / आळेफाटा ला परत जाण्यासाठी एस.टी बस हात दाखवून थांबतात.  
  • नाणेघाटात जेवणाची सोय नाही, त्यामुळे जेवणाचं सामान स्वतः घेऊन जावे.  
  • सुट्यांच्या दिवशी कल्याण वरून माळशेज मार्गे जाण्याऱ्या गाडयांना गर्दीचे प्रमाण जास्त असते.  
  • स.टी बस ला नाणेघाट हा बस थांबा नाही, त्यामुळे तिकीट काढताना कंडक्टर ला विचारावे. 
  • खाजगी गाडीने गेल्यावर थेट नाणेघाटाजवळ जाता येते. 

आमचा  खर्च:

  • एकूण खर्च : रु. ५०० / व्यक्ती 

अनुभव आणि  छायाचित्र :

                         

                                सकाळी ८ वा. ३० मि. कल्याण डेपो मधून नाणेघाट ला जाण्यासाठी बस पकडली

भिवंडी संगमनेर बस
                                 २ ता. प्रवास करून शेवटी नाणेघाटाकडे जाण्याऱ्या रस्त्याजवळ उतरलो.

नाणेघाट नामनिर्देशित फलक

जंगलातून जाणारा रस्ता


                      २ ता. चालत गेल्यावर नाणेघाटावर जाण्यासाठी दगडाच्या पायऱ्या लागतात. 






                                 ३ ता. चालत, पावसात भिजत नाणेघाटावर पोहचलो.

गुहा





                                        २ तासानंतर नाणेघाटावरून परत जाण्यास निघालो. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा