नाव : पुरंदर किल्ला (Purandar fort)
उंची : ४४७२ फूट
दर्जा : सोपा
ठिकाण : नारायणपूर (पुणे)
वेळ : १ ता ३० मि (पायथ्यापासून )
कसे पोहोचायचे :
पुणे मार्गे:
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव नारायणपूर पर्यंत पोहोचण्यासाठी पुणे ते नारायणपूर एसटी बस उपलब्ध आहे. पुणे एसटी डेपो मधून सासवडच्या दिशेने(जेजुरी ,पंढरपूर , इंदापूर इ. ) जाणारी बस पकडुन सासवडला उतरावे.
सासवड मार्गे:
सासवड - भोर एसटी बस पकडुन नारायणपूर गावाच्या पुढे असणार्या ’पुरंदर घाटमाथा’ या थांब्यावर उतरावे. सासवड ते नारायणपूर ही अशी एसटी बस सेवा सुद्धा उपलब्ध आहे.
तसेच सासवड / नारायणपूर गावातून किल्ल्याच्या प्रवेश द्व्यारापर्यंत खाजगी वाहने पण भाड्याने करता येतात.
सूचना:
- खाजगी वाहने भाड्याने करताना पैसे , वेळ आणि पहाण्याची ठिकाणे ठरवुन घ्यावे.
- पुरंदर किल्ला भारतीय लष्कराच्या हद्दीत असल्यामुळे कमीत कमी ग्रुप मधील एकाकडे ओळख पत्र (पॅन कार्ड, आधार कार्ड, गाडी चालवायचा परवाना इ. ) असावे .
- किल्ला पाहण्याची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
- गडाच्या पायथ्याशी कॅमेरा आणि कॅमेरा असलेले मोबाईल भारतीय लष्कराकडे जमा करावे लागतात.
- किल्ला भारतीय लष्कराच्या हद्दीत असल्यामुळे ’पुरंदर घाटमाथा’ या बस थांब्यावरुन गडावर जाण्याची वाट सुरु आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी.
- सासवड / नारायणपूर गावातून किल्ल्याच्या प्रवेश द्वारापर्यंत खाजगी वाहनाने प्रवास करणे योग्य ठरेल.
अनुभव आणि छायाचित्र :
रात्रीची १०. ५५ मि शिर्डी फास्ट पासेंजर ट्रेन पकडून आम्ही १८ जणांनी आमच्या प्रवासाला सुरवात केली.
 |
शिर्डी फास्ट पासेंजर |
रात्रभर ट्रेन मध्ये अंताक्षरी खेळत आम्ही सकाळी ४ वा. १५ मि.पुणे स्टेशन वर पोचलो पुणे स्टेशन वर चहा नाष्टा करून सकाळी ६ वा. सासवडला जाणारी बस पकडुन अंदाजे १ तासात सासवडला उतारलो.
 |
नाष्टा |
 |
पुणे -इंदापूर बस |
 |
सासवड बस स्थानक |
 |
सेल्फी |
सासवडमधुन खाजगी वाहन करून आम्ही पुरंदर किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.
 |
भाड्याने केलेले खाजगी वाहन |
सकाळी ८ वा ३० मि किल्ल्याच्या प्रवेश द्वाराजवळ पोचल्यामुळे, अर्धा तास किल्ल्याच्या प्रवेश द्व्यारासमोर फोटो काढत टाईम पास करत सकाळी ९ वा किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली.
गडाच्या पायथ्याशी कॅमेरा आणि कॅमेरा असलेले मोबाईल भारतीय लष्कराकडे जमा केल्यामुळे गडावर फोटो न काढण्याची खंत यावेळी जाणवत होती.

 |
वीर मुरार बाजी देशपांडे |
दुपारी २ वा गाडीत बसुन परतीच्या प्रवासाला सुरवात केली. दत्त मंदीरात दत्ताचे दर्शन घेऊन आम्ही ३ वा सासवडला पोचलो.
 |
दत्त मंदिर |
सासवड -स्वारगेट -पुणे असा प्रवास करत पुण्याहून ६ वा ट्रेन पकडली.