शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

सोंडाई


   नाव      : सोंडाई किल्ला(Sondai)

   उंची      : १२०० फूट 

   दर्जा      : मध्यम

   ठिकाण : कर्जत

    वेळ       : २-३ तास वावरले गावापासुन







कसे पोहोचायचे :
                   कर्जत स्टेशन वर लोणावळ्या च्या दिशेने जाऊन पूर्वेला बाहेर पडावे. तेथून टम-टम (6 Sitter) किंवा एस.टी (ST) बस ने वावरले फाट्याजवळ उतरावे. वावरले गावाच्या वेशीतून शाळेपर्यंत चालत गेल्यावर शाळेपासून डावीकडे वळून रस्ता बोरगाव मधून सोंडेवाडी गावात पोचातो. सोंडेवाडी गावाच्या उजवीकडून गडावर रस्ता जातो.
तसेच कर्जत पासुन सोंडेवाडी गावापर्यंत गाडी / टम-टम (6 Sitter) करून किंवा एस.टी (ST) बस / टम-टम (6 Sitter) ने बोरगाव फाट्याजवळ जाता येते.

सूचना
            वावरलेगाव ते सोंडेवाडी हा प्रवास जवळपास पूर्ण डांबरी रस्तावरून आहे त्यामुळे कर्जत ते सोंडेवाडी प्रवास टम-टम (6 Sitter) ने केला तरी योग्य ठरेल

अनुभव आणि  छायाचित्र :

            
विकट(Vikatgad) गडाच्या ट्रेक नंतर हा एक नवीन ब्लॉग जो सोंडाई (Sondai) गडावर आधारित आहे.कर्जत पासून ५-६ किमी अंतरावर असलेला हा गड तसा प्रसिध्द किंवा जास्त जणांना माहीत नाही.
कर्जत स्टेशन
कर्जत स्टेशन
वावरले आणि सोंडेवाडी ही दोन गावे गडाच्या पायथ्याशी वसलेली आहेत. सकाळी सकाळी कर्जत रेल्वे स्टेशन ला उतरल्यावर थोडा नाष्ता करुन एस.टी (ST)डेपो कडे आम्ही आमचा प्रवास सुरु केला. 

कर्जत  एस.टी डेपो



पनवेलला जाणारी एस.टी (ST) पकडून आम्ही वावरले फाट्याजवळ उतरलो. 








उतरल्यानंतर वावरले गावाच्या वेशीतून आम्ही सोंडाई (Sondai) च्या दिशेने वाटचाल सुरु केली.








 वावरलेगाव-मोरबे धरण-बोरगाव-सोंडेवाडी असा चालत प्रवास करत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो.

  

















बस मध्ये बसलो तेव्हा धो-धो पावसाला सुरवात झाली होती पण ज्यावेळी सोंडाई  (Sondai) च्या दिशेने चालत प्रवास सुरु केला तेव्हा कडाक्याच उन पडले होते. बोरगाव ते सोंडेवाडी मध्ये एका छोट्याश्या धबधब्यावर भिजुन पावसाची कमतरता भरून काढली.


 


















   सोंडेवाडी पासुन खरी ट्रेक ला सुरवात झाली.



















दगडांतून रस्ता काढत आम्ही गडावर जायला सुरवात केली.










निरासार्गाचा आनंद घेत गडावर जाण्याची मज्जा आम्ही अनुभवत होतो. हिरव्या गवतावरून चालत तर कुठे दगड ,लोखंडी शिडी चढुन आम्ही गडावर पोचलो.






















गडावर शिवाजी महाराज्यांचे चित्र असलेला भगवा झेंडा फडकता पाहुन गडावर आल्याचे सार्थक झाल्यासारके वाटले.

चालत जास्त प्रवास केल्यामुळे भुक लागली होती, गडावर बसुन सगळ्यांनी आणलेले वेगवेगळे पदार्थ खाऊन पोटाला शांत केले.














 गडावरून गावे जशी चित्रात काढलेल्या गावांसारखी दिसत होती. गडाच्या जवळ आणि उंच असलेला गवरी(Gavari) डोंगर पण गडावरून  पाहता येतो.





















गडावर खेळ खेळून, गप्पा मारत बराच वेळ घालवल्यावर गड उतरायला सुरवात केली. उतरताना मात्र पावसाने हजेरी लावत आम्हाला चिंब भिजवुन टाकले.



 यावेळी मात्र ज्या रस्त्याने गड चढायला सुरवात केली त्याच रस्त्याने उतरलो. सोंडेवाडी पासुन काही अंतरा वरुन गाडी पकडुन ५ वा. कर्जत स्टेशन वर पोचलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा